RAINFALL FORECAST TILL 15th JULY 2021 IN AND AROUND NAGPUR REGION
पर्जन्यमान अंदाज
पुनर्वसू नक्षत्र पर्जन्य योग
6 जुलै ते 20 जुलै 2021
ह्या वर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात पाऊस बेताचा पण चांगला झाला, मागे भाकीत केल्या प्रमाणे आद्रा नक्षत्रात पाऊस तुरळक ठिकाणी तो पण तुरळक पडला.
सुर्यानी दि 6 जुलै ला सकाळी 2.34वा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला. सर्याच्या ह्या नक्षत्रात असताना चंद्र रोहिणी ते अनुराधा ह्या नक्षत्रातून भ्रमण करत आहे.
सध्या मंगळ कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रातुन भ्रमण करत आहे,तो 20 ता सिंह ह्याअग्नी तत्वाच्या राशीत भ्रमण करेल.बुध मृग ते पुनर्वसू, शुक्र आश्लेषा ते मघा नक्षत्रातुन , गुरू - शततारका, शनी- श्रवण, राहू- रोहिणी, व केतू- अनुराधा नक्षत्रातुन भ्रमण करत आहेत
एकंदरीत ह्या ग्रहांच्या गोचरभ्रमण स्थिती व गती, प्रमाणे
दि 7 जुलै ला पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पण तुरळक पाऊस पडेल, 9 ता महाराष्ट्रतील पुष्कळ जिल्ह्यात पर्जन्य वृष्टी होईल. 12 ता. वाऱ्याची दिशा बदलेल व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल ह्या मुळे 12 ते 16 जुलै दरम्यानच्या नाशिक, अहमदनगर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे, तसेच पश्चिम महाराष्ट्र तील पुणे,सोलापूर, सातारा, ह्या जिल्हात काही ठिकाणी पाऊस पडेल.
पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला, बुलढाणा,ह्या बहुतांश जिह्यात 14 ता नंतरच पाऊस येईल तो पण बेताचाच पडेल. जोरदार वारा सुटेल, विजा चमकतील पण पाऊस तुरळक ठिकाणी तुरळक पडेल, साधारण 13-14 मिनिट किंवा जास्तीत जास्त 39 मिनिटे पावसाची एक सर येईल.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा,नागपूर ह्या जिल्ह्यात पाऊस 14 - 16 जुलै दरम्यान येईल.
15 जुलै नंतर पाऊस उत्तर भारत कडे आपला प्रवास सुरु करेल.
एकंदरीत संपूर्ण नक्षत्रात पाऊस सरासरी पेक्ष्या कमी आहे. सर्व शेतकरी बांधवांनी त्या प्रमाणे पिकांचे नियोजन करावे
पुढील पर्जन्यमानअंदाज 21जुलै ला.....
डॉ मुकुंद मोहोळकर
Ph.D (वेदांग ज्योतिष्य)
Ph D(Business Managemant)
9823116709
(SHARED HERE WITH DUE PERMISSION)